श्री स्वामी समर्थ,
स्वामी हो,
स्वामी समर्थ भक्त परिवार आयोजित ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ हे महानाट्य २६-२९ जानेवारी दरम्यान मुंबईत कामगार मैदानावर पार पडले,
स्वामी कृपेने ,प पु श्री नाना परांजपे व प पु श्री काका महाराज जोशी, यांच्या आशीर्वादाने व सर्व स्वामी भक्तांच्या साक्षीने न नयनरम्य सोहळा पार पडला,जवळ जवळ १६ हजार भक्तांनी या महानाट्याचा लाभ घेतला.
२६ जानेवारी ला दत्त दिगंबर , श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, व श्री साई बाबा यांच्या प्रतिमे पूजन व आरतीने श्री किसनगिरी महाराज मठ (सरूड, कोल्हापूर)चे अधिपती प पु श्री पार्ले गिरी महाराज ,अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान समितीचे विश्वस्त, दादर चे श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त ,गिरगाव मठाचे भाऊ रुपजी, विले पार्ले मठाचे सदस्य ,यांच्या हस्ते उद्घाटन झाले.याच वेळी स्वामी समर्थ भक्त परिवारचे पहिले प्रकाशन " गुरुमंत्र" व "स्वास्थ्यासाठी केवळ अर्धा तास" ह्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.या महानाट्याच्या दरम्यान प्रसिद्ध चित्रकार श्री शेखर संत यांचे स्वामी व त्यांच्या विविध मुद्रांचे चित्रांचे प्रदर्शन भार्वेण्यात आले होते.तसेच श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ ,बडोदा यांचे तर्फे विविध स्वामीं वर आधारित साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आले होते.सुंदर रांगोळ्या ,अनेक मान्यवर, संस्था , मठाधिपती व मुंबई व्यतरिक्त गोवा ,बडोदा, सातारा,सांगली,रत्नागिरी,पुणे, नाशिक येतून भक्त, सुरेल संगीत, नृत्य संवाद यांच्या मंगलमय वातावरणात ४ दिवस अनुपम सोहळा म्हणून पार पडले.
स्वामी भक्त हो,
अनेक लीला दाखवणाऱ्या स्वामी समर्थांची लीला विस्मयकारी आहे, हा अनुभव आम्ही या महानाट्याच्या निमित्तेने आम्ही घेतला,अनेक अडी-अडचणींना सामोरे जात आम्ही धन्य झालो ते केवळ स्वामी कृपा, सद्गुरू कृपा व आपल्या मुळे,आम्ही आपले आभारी आहोत.
आमच्या परिवारात आपण अद्यापि सामील झाले नसल्यास आपण यावे व्हावे हे विनंती,
अनेक नवीन शिखर गाठायचे आहेत, स्वामी कृपा असेल तर काय कमी आहे?
या महानाट्याच्या जमा पैशाचा हिशोब आम्ही लवकरच आमच्या वेब साईत वर टाकण्याचा प्रयत्ने करू.
स्वामी समर्थ,
संतोष रोकडे मुंबई, ९९३००७५२९५
Subscribe to:
Posts (Atom)