Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

आदि शंकराचार्य विरचित गुरु पादुका स्तोत्रम् – मराठी अर्थ सहित (Guru padukabhyam stotra with meaning in Marathi)

 

अनन्त संसार समुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्याम् |
वैराग्यसाम्राज्यदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

जन्म मरणाच्या संसारच्या फेऱ्यातून पार करण्यासाठी नौका बनवून येणाऱ्या, गुरु भक्ती वाढविणाऱ्या आणि वैराग्य रूपी समृद्धी / राज्य देणाऱ्या , माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

कवित्व वाराशि निशाकराभ्यां दौर्भाग्यदावां बुदमालिकाभ्याम् |
दूरिकृतानम्र विपत्ततिभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

दुर्दैवाच्या आगीला पाऊस बनून बरसून ती आग विजवणाऱ्या आणि असे करून श्री सद्गुरूना शरण जाणाऱ्यांचे विविध समस्या दूर करणाऱ्या आणि ज्ञानरूपी सागराला पौर्णिमेच्या चंद्रा प्रमाणे प्रेरित करणाऱ्या, माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नता ययोः श्रीपतितां समीयुः कदाचिदप्याशु दरिद्रवर्याः |
मूकाश्र्च वाचस्पतितां हि ताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

जे श्री सदगुरूंच्या पादुकांनसमोर शरण जातात, ते सर्व श्रीमंत होतात, इतके की ते अत्यंत दारिद्राच्या दलदलीत अडकले असेल तरीही त्यांची त्यातून सुटका होते, ते श्रीमंत होतात. ह्यांच्या दर्शनाने मुका व्यक्ति एक उत्तम वक्ता होतो, अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नालीकनीकाश पदाहृताभ्यां नाना विमोहादि निवारिकाभ्यां |
नमज्जनाभीष्टततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

अज्ञानातून निर्माण होणाऱ्या विविध इच्छा नष्ट करणाऱ्या आणि सद भावनेतून शरण आल्यास आपल्या शिष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा, कमळाप्रमाणे कोमल असे गुरूंचे पद नेणाऱ्या आणि समृद्धी देणाऱ्या माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

नृपालि मौलि व्रज रत्नकान्ति सरिद्विराजज्झषकन्यकाभ्यां |
नृपत्वदाभ्यां नतलोकपङ्कते: नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो जे हीऱ्यांच्या तलावात तरुण माशांसारखे चमकत असतात, हे हिरे राजाच्या मुकूटात लावले जातात आणि ते भक्ताला एक सार्वभौम सम्राटाप्रमाणे राज्य देतात.

 

पापान्धकारार्क परम्पराभ्यां तापत्रयाहीन्द्र खगेश्र्वराभ्यां |
जाड्याब्धि संशोषण वाडवाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

ह्या पादुका पापरूपी अंधकार नष्ट करणाऱ्या सूर्यमालिके सारखे आहेत. ते  भक्ताच्या त्रिस्तरीय कष्ट (दैहिक, दैविक/प्राकृतिक, भौतिक) रूपी सापाला , पक्ष्यांचा राज्य, गरुडा  सारखे आहेत, अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो..

 

शमादिषट्क प्रदवैभवाभ्यां समाधिदान व्रतदीक्षिताभ्यां |
रमाधवान्ध्रिस्थिरभक्तिदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

ह्या पादुका भक्ताला मनात निर्माण होणारे सहा वैभव मिळवून देतात. आणि रमा – माधव (विष्णु लक्ष्मी) यांच्या चरणी चिरकाल भक्तीचे स्थान मिळवून देण्याचे वचन देतात. अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

स्वार्चापराणां अखिलेष्टदाभ्यां स्वाहासहायाक्षधुरन्धराभ्यां |
स्वान्ताच्छभावप्रदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

जे भक्त सदैव परोपकार सेवा करण्यास सदैव तयार असतात अशानचे सर्व मनोकामना ह्या पादुका सदैव पूर्ण करतात. ते प्रत्यक्ष तीन नेत्र असणाऱ्या शिव इतकेच श्रेष्ठ आहेत. ज्या पादुकांचे पूजन केल्यास आत्मा आणि स्वतःव एक होतात,  अशा माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो.

 

कामादिसर्प व्रजगारुडाभ्यां विवेकवैराग्य निधिप्रदाभ्यां |
बोधप्रदाभ्यां दृतमोक्षदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम्

सर्प रूपी काम आणि मोहाला गरुड प्रमाणे असणाऱ्या, वैराग्य आणि विवेक-भावाचे वैभवशाली प्रदान करणारे, आणि असे करून तात्काळ मोक्ष प्रदान करू शकणारे ज्ञानाची जाणीव करून देणाऱ्या माझ्या प्रिय सदगुरन्च्या पूजनीय अशा पादुकांना मी वारंवार शरण येऊन नमस्कार करतो..

आनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी

श्री स्वामी समर्थ महाराज की जय, 

अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त  

*श्री स्वामी चरणारपानमास्तू*